Skip to main content

लहान मुलांसाठी होमिओपॅथीक उपचार पद्धती

लहान मुलांसाठी होमिओपॅथीक उपचार पद्धती …(Dr.Ratnadeep Gacche )

होमिओपॅथी ही माझ्या मुलाकरीता सुरक्षित आहे, हे कश्याप्रकारे खरे आहे! आजच्या काळात सगळेच आई आणि वडील (ममा, पप्पा) आपल्या बच्चूला जिवापाड प्रेम करतात, म्हणूनच ते त्याच्यासाठी होमिओपॅथी ची निवड करतात . सुरुवातीलालहान मुलांची प्रतिकार शक्ती ही कमी असते, ती मोठ्यांसारखी पूर्णपणे विकसित होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्याची प्रतिकार शक्ती ही स्टेप -स्टेप ने विकसित होते. मणून लहान मुलांचे आजारी राहण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि मोठ्यांचे कमी .
होमिओपॅथी कश्याप्रकारे सुरक्षित आहे : प्रथमतः आपल्या बाळाला देण्यात येणारे औषधहे कुठल्याही साइड - इफेक्ट्स शिवाय असायला हव. होमिओपॅथीक औषधी ही मुख्यत्वे वनस्पती, खनिजे, ई . पासून तयार केली जातात आणि अतिशय कमी प्रमाणात दिले जातात की,१००% साइड - इफेक्ट्स शिवाय असतात. दुसऱ्या औषधी सारखे होमिओपॅथीक औषधी पाचन संस्था, प्रतिकार शक्तीला कुठलीही हानी पोहोंचवत नाही, कुठलीही रिअक्शन होत नाही, जास्त कालासाठी पण आपण होमिओपॅथीक औषधी आपण घेऊ शकतो .
होमिओपॅथी -काळजीवाहू पाल्याची आपल्या मुलांसाठीची निवड : होमिओपॅथी ही जलद आणि प्रभावी उपचार पद्धती - आतापर्यंत होमिओपॅथीक डॉक्टरांच्या अस लक्षात आल आहे की;लहान मुले ही जास्त संवेदनशीलअसतात, म्हणून ते होमिओपॅथीक औषधीना जलद प्रतिसाद देतात, मग ते ताप, हगवण, सर्दी, खोकला, अस्थमा,त्वचा रोग, ई .आणी आणखी कोनताही आजार असोत नवीन किंवा जुनाट आजार असोत त्यावर होमिओपँथी औषधी उपचार आहे. होमिओपॅथी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे :होमिओपॅथी ही नैसर्गिक आश्या तत्वांवर आधारित आहे, (like cure like) जश्यास तसे बरे करणे. होमिओपॅथीचा प्रभावीपना हा वैज्ञानिक दृष्ट्या तपासण्यात आला आहे आणि तो वरचेवर सकारात्मक दिसून आला आहे.
होमिओपॅथी ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते : लहान मुले वारंवार कमी रोगप्रतिकारक शक्तीमुळे आजारी असतात. योग्य होमिओपॅथीक औषधी ह्या मुलांचा शारीरिक तसेच मानसिक आभ्यास करून दिली जातात, ज्यामुळे आजार हा मुळातून बारा होतो. त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीत कमालीची वाढ होते, इतकाच नव्हे त्याचं वारंवार आजारी पडण्याच प्रमाण देखील कमी होत.
होमिओपॅथी तुमच्या मुलांचा बेस्ट फ्रेण्ड : होमिओपॅथीक गोळ्या ह्या चवीला गोड असतात, त्यामुळे मुले आवडीने त्याचा स्वीकार करतात. औषधी कडू नसल्यामुळे मुले कधी त्यांना नाकारत नाहीत. ही औषधी घेण्यास इतक्या सोप्या असतात की आपण मुलांच्या औषधीसाठी च्या चिडचिडपानापासून, रडण्यापासून सहजपणे दूर राहू शकतो. इंजेक्शन्स चा वापर नसल्यामुळे होणाऱ्या तीव्र वेदनापासून आपण आपल्या मुलांना दूर ठेऊ शकतो .
प्रत्येक वयोगटातील बालक/तरुन/तरुनी/स्त्री/पुरुष/वयोवृद्ध यांनी फक्त होमिओपँथी औषधउपचार घ्यावा......
:- डॉ.रत्नदीप गच्चे

Comments

Popular posts from this blog

चावडी उद्योग मार्गदर्शन केंद्र

२५०+ व्यवसाय, उद्योग, धंद्यांचे मार्गदर्शन / प्रशिक्षण मिळवा मराठीत ------------------------------------------- खास स्वताचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नव उद्योजकासाठी. आपल्या घरच्या घरी लघु उद्...

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ------------------------------------------- महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( www.mced.nic.in ) ही संस्था शासनाच्या पुढाकाराने स्थापन झालेली आणि उद्योग विभागाच्या आधिपत्याखाली क...

वाया जाणाऱ्या ऊस पाचटा पासुन सुरु केला उद्योग

वाया जाणार्या ऊस पाचटा पासून सुरु केला उद्योग ------------------------------------------- शेतीपूरक उद्योग ही काळाची गरज असल्याचे ओळखून प्रवीण लंगोटे या तरुण अभियंत्याने उसाच्या पाचटापासून ब्रिकेट (कोळस...